ओढून इथे मज कुणी आणले आहे ?
माझे न गाव हे,नीट जाणले आहे...
मुक्काम किती हा उरला याच ठिकाणी ?
हे फार तात्त्विक वाटते हो. सार्त चे 'नो एक्झिट पेक्षा नो एंट्री परवडले' ची आठवण झाली आणि धस्स झाले.
अतिशय वेधक कविता. मी खोप दिवसांनी मनोगतावर आल्याचे सार्थक झाले.
(आता मला जितका वेळ येथे मनोगतावर मुक्काम करायला मिळेल तितका करावासा वाटतो )
मला वाटते -
ओढून मला ना कुणी आणले आहे.
माझेच गाव हे नीट जाणले आहे.
मुक्काम करावा आता याच ठिकाणी