खरोखरच परकीय भाषेसाठी दुभाष्याचे काम करणे कठीण कारण प्रत्येक भाषेचे उच्चार हे
इतके वेगळे असतात की आपण परकीय भाषेत बोललेले त्या मंडळींना समजून घ्यायला फार
कष्ट पडतात. पूर्वी मी नव्याने जर्मन शिकताना रस्त्यात कुठल्याही युरोपीयन दिसणार्या
माणसाला गाठून धेडगुजरी जर्मन फाडत असे. माझे उच्चार समजावून घेता घेता त्यांची
बिचार्यांची त्रेधातिरपीट उडत असे त्याचीच आठवण झाली. असो.
चांगले उच्चपदस्थ मिळणे हे पूर्वसंचित म्हणायला हरकत नाही.