वर्षा सान, लेख अतिशय आवडला. माझ्या जपानी शिकण्याच्या दिवसांची आठवण झाली. तेंव्हा आम्ही जपानी बोलायला इतके आसुसलेलो असायचो(आणि येत मात्र खरोखरच फार थोडं होतं) की जपानी बाहुल्यांच्या प्रदर्शनात जपानी कॉन्स्युलेट जनरल(मराठी शब्द कोणी सांगेल का?) च्या समोर जाऊन मुद्दाम जपानी 'फाडफाडून' आलो होतो तेही आठवलं.
आयुष्यात पहिल्या नोकरीतला पहिला बॉस हा प्राथमिक शाळेतल्या शिक्षकासारखा असतो कारण नंतरच्या व्यावसायिक आयुष्यात अत्यंत संकटांच्या प्रसंगी त्याने केलेला उपदेश किंवा त्याच्याबरोबर काम करण्याचे अनुभव नकळत आठवतात आणि प्रचंड धीर देऊन जातात असा अनुभव आहे. तुमचे बॉस हे बॉस पेक्षा सेन्सेई अधिक होते असं वाटतं. काही माणसं आपल्या वागणुकीतून खूप मोलाचे धडे देत असतात. अशा माणसांबरोबर काम करायला मिळणं ही खरोखरच पूर्वपुण्याई असते. ती संधी तुम्हाला मिळाली याबद्दल तुमचं अभिनंदन आणि भविष्यातही अशीच चांगली माणसे तुम्हाला सर्वत्र लाभोत या सदिच्छेत अनुशी सहमत.
योन्दा अतो दे तानोशिमिनि नारिमाश्ता यो! सुगोई देस ने....
--अदिती