वर्षा,
एखाद्याला इतका चांगला बॉस मिळावा, ह्यालाही थोर भाग्य लागतं.
त्याच प्रमाणे आपल्या बॉसच्या व्यक्तिमत्त्वाचं, योग्यतेचं परिपूर्ण मुल्यमापन करू शकणारा, बॉसच्या व्यक्तिमत्त्वाचा डोळस अभ्यास करून, बॉसची बलस्थानं शोधून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात योग्य ते प्रगतीकारक बदल जाणीवपूर्वक घडविणारा तुमच्या सारखा संवेदनशील सहाय्यक लाभणं हेही श्री. योशिदांचे भाग्यच म्हणावे लागेल.
मलाही, माझ्या सुरुवातीच्या काळात, असे बॉस लाभले होते. त्यांच्या सानिध्यात मीही अनेक गोष्टी कळत-नकळत शिकलो त्याचा मला खूप फायदा झाला, आजतागायत होतो आहे आणि भविष्यातही होईल ह्याची मला खात्री आहे.
लेख उत्तम लिहीला आहे. अभिनंदन.