लेखन, चित्रवर्णन एकंदर छान आहे. ऋतूबदलांनुसार होणारे निसर्गातले, मानवी दिनचर्येतले, आवडीनिवडींमधले इ. बदल अचूक टिपले आहेत, आणि चपखल उदाहरणांमुळे ते पुरेसे स्पष्टही झाले आहेत. आवडले.
पहिला परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला. आगगाडीच्या डब्याशी केलेली तुलना अकल्पित/अनपेक्षित पण तरीही गमतीशीर वाटली. मग येणाऱ्या वसंताबद्दल-ग्रीष्माबद्दल शेवटी लिहिणे मात्र गुंडाळल्यागत वाटले. थंडीच्या दिवसांची जशी आगगाडीच्या डब्याशी तुलना केली, तशीच गमतीशीर तुलना वसंत-ग्रीष्माचीही कशाशीतरी करता आली असती का? जेणेकरून माझा आवडता ऋतू कोणता, या प्रश्नाने वाचकांनाही विचार करायला भाग पाडले असते. पहिले दोन परिच्छेद थंडीबद्दल भरभरून बोलून, वसंत-ग्रीष्माबद्दल एकमेव परिच्छेद आणि मग आवडता ऋतू कोणता हा प्रश्न - उत्तर बव्हंशी 'हिवाळा' असेच अपेक्षित होऊ शकते.
शेवटच्या परिच्छेदातील संदेश/विचारलेला प्रश्न उत्तम. मात्र एकूण लेखन आणि लेखनाचे शीर्षक यांतला परस्परसंबंध (मला) पूर्ण अस्पष्ट वाटतो आहे.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.