अत्यंत प्रभावशाली आणि वास्तवदर्शी लेखन आहे.

भरल्या पोटाने, उपाशी माणसाने चोरी करावी की नाही ही, चर्चा करणे सोपे असते. भुकेचा जाळ आणि रोगाची साथ पोटच्या पोरांचा तडफडवून जीव घेत असताना नैतिकता आणि अनैतिकता ह्यावरील चर्चा त्यांचे प्राण वाचवू शकत नाही.
जन्मदाता बाप चोरी करून खडी फोडायला जाणे पत्करतो पण आपल्या मुलाबाळांचा, कुटुंबाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतो.

कुणाही सहृदय माणसाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे कथानक आहे.

मन सुन्न झाले आहे.