सध्या थंडीचे दिवस अजून पूर्ण विस्मृतीत गेले नाहीत त्यामुळे थंडीचे वर्णन जास्त विस्ताराने केले आहे. उन्हाळ्याचे/ग्रीष्माचे वर्णन आत्ताच करून या दिवसांची मजा का घालवायची? योग्य वेळी तेही करूच की!
--- संबंधित लेखनासाठी उत्सुक आहे. वाचायला आवडेल. मात्र तुझ्या लेखनाचा 'ट्रॅक रेकॉर्ड' आणि लेखनासाठी आवश्यक तो उत्साह, ऊर्जा याबाबतीतला तुझा मूड लक्षात घेता असा लेख काय असेल पेक्षा असेल का आणि कधी असेल, याची उत्सुकता जास्त आहे. असो.
मी हिवाळ्याचे वर्णन केले याचा अर्थ "तुमचा आवडता ऋतू कोणता" या प्रश्नाचे उत्तर हिवाळाच अपेक्षित आहे असा होत नाही. या प्रश्नाचे उत्तर काहीही असू शकते. वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हा या लेखाचा उद्देश नाही. आणि उत्तर देणे बंधनकारकही नाही हे तुलाही मान्य होईल कारण तू तरी त्या प्रश्नाचे उत्तर कुठे दिले आहेस?
--- उद्देश तसा नाही, हे मान्य. मात्र ज्या जोमाने हिवाळ्याचे वर्णन - अगदी आगगाडीच्या डब्यांच्या तुलनेसकट - झाले आहे, ते लक्षात घेता, तसेच वॉल्यूम ऑफ दॅट रिलेटेड कॉंटेंट लक्षात घेता, (शेवटच्या परिच्छेदापर्यंत न पोचता लेखनाच्या मध्यातच)(माझा किंवा/आणि अन्य वाचकांचा) थंडी हाच तुझा आवडता ऋतू असावा, असा समज होणे, मला स्वाभाविक वाटते. माझा प्रतिसाद तू नीट वाचलेला दिसत नाही. मी लेखनाचा उद्देश तोच असावा की असू नये, किंवा काय असावा नि काय असू नये, याबाबत काहीही म्हटलेले नाही. फक्त काय केल्याने अधिक मजा आली असती, त्याबाबत (माझे) मत मांडले आहे. ते करावेच/करच, असा हट्ट/आग्रह कुठेही केलेला नाही/करणारही नाही. त्यासाठी तू तरी त्या प्रश्नाचे उत्तर कुठे दिले आहेस? वगैरे निरुपयोगी, असंबद्ध प्रतिप्रश्न करायची गरज नाही.
बाकी,
कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
येती नि जाती येती नि जाती
अशी (बहुधा) शांता शेळक्यांची एक कविता आहे. ऋतूची मजा घेत दिवस घालवले की ते असे वाटतात( म्ह. कवितेत म्हटल्याप्रमाणे) असं माझं मत आहे. आणि ज्याला ऋतूची मजा घ्यायची आहे त्याला भौगोलिक तीन आणि पारंपारिक सहाही ऋतू असेच वाटणार अशी माझी धारणा आहे. म्हणून लेखाला हे शीर्षक दिले आहे.
--- स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद. शांताबाईंची ही कविता मला (आतापर्यंत) माहीत नसल्याने मला परस्परसंबंध कळला नाही. त्यात माझे काय चुकले? माहीत नव्हते, कळले नाही, म्हणूनच तर विचारले ना?
शालेय अभ्यासक्रमातील निबंध आणि ललितलेखन यात फरक असतो आणि निबंध तपासल्याप्रमाणे ललितलेखन 'तपासल्यास' चवळीची उसळ आणि द्राक्षांचा घड एकाच मापाने मोजणाऱ्या निरिच्छ संन्याश्याला पाककौशल्याबद्दल त्याचे मत विचारल्यासारखे होईल असे प्रामाणिकपणे वाटते.
पुढील समीक्षांसाठी मनापासून शुभेच्छा....
--- अहो पण एखाद्याला द्राक्षाचा घड आणि चवळीची उसळ सारखेच आवडत असतील तर? मला चवळीची उसळही खूप खूपआवडते, आणि द्राक्षेही. मत पाककौशल्याबद्दल कमी नि पाककृतीबद्दलच जास्त आहे. किंबहुना पाककौशल्य वादातीत असल्याने पाककृतीबद्दल मत मांडणे उचित ठरले आहे. आणि चाखलेल्या पाककृतीत मनापासून काय किती आवडले, काय कुठे कमीजास्त झाले, हे सांगण्यात सामान्य, रसिक खवैय्यास आडकाठी कशासाठी? अहो डिशमध्ये वाढले म्हणजे आम्ही चव घेऊन सांगणारच कसं झालंय ते, नाही का? अशी चाखणी (किंवा तुम्हाला वाटलेली तपासणी) नको असेल, तर कमरेस ऍप्रन न बांधलेलाच बरा.