प्रिय चक्रपाणि,
खवैय्याने खाताना आपण काय खातो आहोत याकडे लक्ष द्यावं असा सल्ला आहे. द्राक्षाचा घड आणि चवळीची उसळ मलाही खूप आवडते. पण मी द्राक्ष चवळीची उसळ समजून खात नाही. किंवा तसं खालं तर मला बहुधा ओकारीच होईल. शरद उपाध्ये एक उदाहरण नेहमी देतात(खाण्याचा अनुभव नसल्यामुळे खरंखोटं माहीत नाही) की श्रीखंड आणि मटण दोन्हीही चविष्ट असते पण म्हणून कोणी मटणात साखर घालत नाहीत.
श्रीखंड मटण समजून खाऊ नये हे सांगण्यास कमरेस एप्रन बांधायची गरज नाही. वाढणाऱ्याने डिशमध्ये काय वाढलंय हे सांगायचा अधिकार (की कर्तव्य) त्याला नक्कीच आहे.
मला इथे एक्झॅक्टली शरद उपाध्यांनी जे म्हटलंय तेच म्हणायचं आहे. होप माय पॉईंट इज क्लियर बाय नाऊ.
बाकी ग्रीष्माबद्दल मागे एका कवितेत बरंच लिहून झालं आहे. हवं तर ते वाच.