थंडीचे दिवस मला त्या आगगाडीच्या डब्यासारखेच
वाटतात. सगळं विश्व आकुंचन पावून आपल्या हाताच्या परिघाएवढं झालेलं असतं.
सगळंच हाताच्या अंतरावर असावं असं वाटत असतं. एकमेकांना धरून राहावं,
सगळ्यांनी मिळून घरातलं वातावरण उबदार करून सोडावं, दारं खिडक्या बंद करून
ज्याला इंग्रजीमध्ये कोझी कोझी म्हणतात तसं वातावरण घरी सतत असावं असं
वाटतं. खावं, प्यावं, व्यायामाचं नावही काढू नये आणि त्या क्षणाचा आनंद
घेत बसून राहावं असं वाटत राहातं.
ही तुलना फार आवडली. लेख अगदी छान झाला आहे. अभिनंदन!