तसली नज़र: एक सत्यकथा
एका अतिशय सुंदर मुलीला तिला लहानपणापासून चांगलं ओळखणाऱ्या मुलानं मागणी घातली. "तुला लाज कशी वाटली नाही हे बोलताना. मी तुला तसल्या नजरेने कधी बघितलेच नव्हते," असे त्या मुलीने ऐकवले. तिला खरे तर "तोंड पाहिलयंस का आरशात?" किंवा "तुझी लायकी काय माहिती आहे काय?" ह्यापैकी नक्की कुठले वाक्य फेकावे हे न कळल्यामुळे तिने त्याची लाज काढली असावी. कारण ती मुलगी खरंच फारच सुंदर होती, आहे आणि हा अगदी 'हरीश' होता. असो. तर तिचे उत्तर ऐकून हा मुलगा बहिरा झाला. ठार नाही पण बऱ्यापैकी. तिचे कुणी नाव घेतलेले मात्र स्पष्ट ऐकू येत असे. "**ती माझ्या श्वासांत आहे, ह्याच्यात आहे, त्याच्यात आहे," असे तो नेहमीच म्हणायचा. विशेषतः दोनचार पेग झाल्यावर. गंमत म्हणजे त्याला चढल्यावर अगदी नीट ऐकू येत असे. काही दिवसांपूर्वी भेटला. त्याचे लग्न झाले होतो. आता त्याचा बहिरेपणा पूर्णपणे बरा झाला आहे.