काल नाशिक ला ५५ वर्षांचे एक ग्रुहस्थ दंगलीत म्रूत्युमुखी पडले, त्यांचा काय दोष होता? आता सगळे त्यांच्या घरच्यांचे सांत्वन करतील, १/२ लाख मदत जाहीर होईल, एखाद्या मुलाला नोकरी मिळेल, पण त्यांचा एक आधार कायमचा गेला ना!
वर तुम्ही लिहिलेली घटना अत्यंत दुःखदायक आणि क्लेशकारक आहे ह्यात अजिबात शंका नाही.
हे असे प्रकार गेल्या काही काळात वरचे वर घडू लागले आहेत ! हे समाजाचे स्वास्थ्य बिघडवणारे आहे. कोणी ही उठाव आणि गाव, राज्य बंद पाडाव, बसेस जाळून, तोडफोड करून ( एकाप्रकारे आपलच ) नुकसान कराव. हे सगळ कुठे तरी थांबयलाच हव.
अगदी बरोबर म्हणणे. मात्र हे प्रकार फार पूर्वीपासूनचे (आणि जगात सगळीकडेच?) आहेत, असे वाटते. (हे मी त्यांचे समर्थन म्हणून लिहित नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.)