वर्षा,
आपल्या करीयरच्या सुरूवातीला चांगले बॉस मिळणे हे भाग्य सगळ्यांनाच असते असे नाही. पण तसे ते मिळाले तरी त्याचा लाभ ऊठवता येणे ह्यासाठीही आपल्यापाशीही काही गुण असावे लागतात. तसे ते तुमच्यात आहेत हे ह्या लेखावरून सहज दिसून येते. म्हणूनच योशिदा सानांच्या अनेक गुणांची आपण कदर करू शकलात, त्यांची शिस्त अंगी बाणवू शकलात.
ह्या लेखात सहजपणे आलेली जपान्यांच्या व आपल्या कामाच्या पद्धतितील फरकाबद्दलची, तसेच सर्वसाधारणपणे व्यवहारात बोलण्या-चालण्याच्या पद्धतितील फरकांबद्दलची टिप्पणी मला विशेष आवडली. तुमच्या ह्या सगळ्या निरीक्षणांशी मी माझ्या स्वतःच्या अनुभवांवरून पूर्ण सहमत आहे.
एक अत्यंत सुंदर लेख लिहील्याबद्दल आभार.