सर्वांना मनः पूर्वक धन्यवाद.

प्रीतीसान, होय, दोन भागात लेख टाकायला हवा होता..मलाही नंतर वाटलं खरं तसं.

मृदुलासान,

>>> चांगले उच्चपदस्थ मिळणे हे पूर्वसंचित म्हणायला हरकत नाही.

- अगदी खरंय!!

अदितीसान, आरिगातो!!!   खरंच पहिली नोकरी, पहिला बॉस सर्वकाही बरंच शिकवून जातात!

बकुळसान, हॅम्लेटसान,

तुम्ही म्हणता तसे किबीशीई लोक मलाही जपानमधल्या क्लायंट कंपनीत पहायला मिळाले!

चित्तसान,

होय लेखातच जपानी शब्दांचे अर्थ द्यायला हवे होते. असो. 'सान' हे आदरार्थी संबोधन माणसांच्या नावानंतर जोडले जाते. माणसेच काय पर्वत किंवा इतर निसर्गालाही हे आदराने संबोधितात. उदा. 'फुजीसान' (जपानमधील सुप्रसिद्ध फुजियामा पर्वत)

साके =  तांदळापासून बनविलेली जपानी वाईन (तिलाही आदराने ओ-साके म्हणतात :))

-वर्षा