आजच्या महा टाईम्स ची ही बातमी आहे -

'आपल्या अटकेनंतर उसळलेल्या नाशिकमधील हिंसाचारात मराठी इंजिनीअर अंबादास धारराव यांचा झालेला मृत्यू आपल्याला आयुष्यभर सलत राहील. मात्र त्यांच्या मृत्यूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील कुणीही कारणीभूत नाही', असे सांगत, धारराव कुटुंबियांची मी व्यक्तिश: हात जोडून माफी मागतो, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सध्या जाहीररीत्या काहीही बोलण्यास बंदी असल्याने राज यांनी गुरुवारी एक पत्रक प्रसिद्ध करून आपले म्हणणे मांडले. नाशिकमधील हिंसाचारात मराठी इंजिनीअर धारराव यांचा झालेला मृत्यू मला आयुष्यभर सलत राहील. त्यांच्या मृत्यूला माझ्या संघटनेतील कोणीही कारणीभूत नसून जे गुंड त्यास कारणीभूत आहेत, त्यांना शिक्षा होईल, अशी माझी अपेक्षा आहे. मात्र अशावेळी काही राजकीय विरोधक व समाजविघातक शक्ती वेदनेच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात, हे निषेधार्ह आहे, असे राज यांनी म्हटले आहे.

पूर्ण बातमी येथे आहे - दुवा क्र. १

(तुम्ही म्हणता ते हेच इंजिनिअर का?)