'परक्या लोकांच्या दादागिरी ला विरोध' हा मुख्य मुद्दा नाही.

हे विरोध किंवा पुतळयांच्या विटंबनां मुळे होणार्या दंगली ह्या मुळे सामान्य लोकांचे होणारे नुकसान आणि त्यांना होणारा त्रास ह्या विषयी मला बोलायचे आहे.

जाळपोळ, दगडफेक ह्या मुळे आपल्याच देशाचे नुकसान होते आहे. देशात इतकी दुफळी असतांना बाहेर चा शत्रू त्याचे हेतू साध्य करणार नाही कशावरुन?

ही सगळे एनर्जी चांगल्या कामासाठी वापरता येइल की आणि परक्या राज्यातल्या लोकांना शोधून त्यांना हाकलण्या बरोबर बाहेरच्या देशातून आगंतुक पणे येउन राहीलेल्या लोकांचे काय?

(आपल्याला त्यांच्या दादागिरीचा अनुभव आलेला दिसत नाही!

असे अनेक अनुभव मराठी लोकांकडून ही येतात.)