लोकशाहीची कल्पना चांगली आहे पण कधीकधी आततायी लोकांच्या लोकशाहीला किती अर्थ राहतो असे वाटायला लागते. (याचा अर्थ इथेही पाकिस्तानसारखे व्हावे असा अजिबात नाही). या प्रकरणात ज्याला अटक झाली आहे तो मनसेचा कार्यकर्ता होता. याची नैतिक जबाबदारी कोणाची? दुसरा प्रश्न. समजा यांच्याऐवजी एखादा यूपी-बिहारमधला मजूर मेला असता तरी राज ठाकरे यांनी असाच माफीनामा दिला असता का? जेव्हा आपण एखादे विधान करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतील हे माहित नसण्याइतके आपले राजकारणी दुधखुळे आहेत का?
राम मंदिर, हिंदू-मुस्लिम दंगे, प्रांतीय वाद, व्हॅलेंटाइन डे हे आपल्यापुढचे ज्वलंत प्रश्न आहेत. यांच्यासाठी रस्त्यावर यायला राजकारणी लोक आवाहन करत आहेत. इथे कोण फसवतो आहे आणि कोण फसतो आहे (किंवा फसवल्याचे भासवतो आहे) हे कळणे कठीण आहे.
हॅम्लेट