पत्रिकेत ग्रहांची स्थिती असते.त्यामुळे पत्रिका मांडण्याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही.पण पत्रिका पाहून भविष्य वर्तवणे निव्वळ अंधश्रद्धा आहे.राशीभविष्य सांगून अनेक दूरदर्शन चॅनेल्स वेळ फुकट घालवीत असतात. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ असतो त्याना लग्न जमविण्यात त्रास होतो. हा त्यांच्यावर अन्याय होतो असे मला वाटते.रामायणात व महाभारतात जी खगोलविषयी वर्णने आहेत ती "आकाशदर्शन" पद्धतीची आहेत.त्यात फलज्योतिष्य नाही असे मी सिद्ध केले आहे.तसेच ती निरयन आहेत‌‌‌. सायन नव्हे.पण काही संशोधकानी फलज्योतिष्य व सायन घुसडून व चूकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल केली आहे.