गुरुजी,
तुम्ही
साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?
कविकुळात कोणी नाव न माझे घाली...
प्रतिसादयाचना केली केविलवाणी !
असं म्हणालात तर 'आमुचिया कविकुळा बोलु ' नाही का लागायचा? तुमचे नाव कवीकुळात नाही घालायचे तर कोणाचे घालायचे सांगा पाहू? आणि केविलवाणी प्रतिसादयाचना इतर विडंबकांच्या नशिबी असते हो!
विडंबन फर्मास झाले आहे हेवेसांनल. तसेही गुरूचे कौतुक शिष्याने करणे यासारखे औध्धत्य नाही पण विडंबकांमध्ये गंगा (बहुधा) उलटी वाहते त्यामुळे हेही चालून जाईल...
--अदिती