या दृष्टीने मूल्यमापन केल्यास समाजाची वेदना सांगणारी कथा म्हणता येईल. हवा पाणी अन्न या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. सरकार जर या देऊ शकत नसेल तर दुष्काळासारख्या आपत्तीत सामान्य माणसाने काय करावे, सरकारी अधिकाऱ्याने काय करावे याचे नागरिकशास्त्रात न मिळणारे शिक्षण या कथेतून मिळते.
तरीही पूर्वप्रकाशित साहित्य प्रकाशित करतांना कॉपीराईटच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ नये ही इच्छा. कृपया यापुढे तशी परवानगी घ्यावी. कॉपीराईटची कालमर्यादा बहुधा आता १५ वर्शापर्यंत कमी करण्यात आली आहे असे वाचल्याचे स्मरते. परंतु कायद्याचे पुस्तक आणून खात्री करून घ्यावी म्हणजे नंतरचे खटले टाळता येतात. हा लेखकास घाबरविण्याचा हेतू नाही. परंतु तशी काळजी घेणे मला तरी अत्यावश्यक वाटते.