असा हा लेख वाचायला मजा आली.
पॉकेटमनी पर्व संपलं आता...आता माझी स्वकमाई चालू होणार....कुठेतरी मनाला सुखद गुदगुल्या झाल्या. खरेच हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात एकदाच येतो. पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.
(आता आठवलं की हसू येतं..पण तेव्हाचा माझा अर्ज हा अत्यंत बाळबोध स्टाईलचा, हाताने लिहिलेला होता आणि वर बायो-डाटा असं मोठ्ठ्याने लिहिलेलं होतं! :) हा बाळबोध प्रांजळपणा आवडला.
सकाळी सकाळी कॉम्प्युटरही चालू करण्याआधी ठीक नऊच्या ठोक्याला सर्वांनी डिपार्टमेंटच्या मध्यभागी एकत्र जमून, उभ्याउभ्याच का होईना पण 'आज तुम्ही कोणतं काम करणार आहात' हे त्रोटक सांगितलं तरी चालेल पण ते सांगण्यासाठी केली जाणारी 'मॉर्निंग मिटिंग' हे शिक्षण त्यापैकीच एक. यामुळे सगळ्यांनाच एकंदरीत सर्वांची काय कामे आहेत याचा ढोबळ अंदाज येतो आणि मग त्या दिवसातली कामे आखायला त्याचा निश्चितच फायदा होतो. आपल्या सरकारी खात्यात फक्त महिन्याया शेवटी महिन्याभरातल्या कामाचे आकडे फुगवून सांगून बढाया मारतात.
दुसर्या प्रकाराने पॉलिशिंग केलं तरी कुठे बिघडलं, काय फरक पडतो..' ही भारतीय विचारसरणी यात अनेकदा खटके उडालेले अनुभवले आहेत. या 'काय फरक पडतो' या वृत्तीचा असलेला अभाव हेच जपान्यांच्या यशामागच्या कारणांमधलं एक कारण असावं हे मत ठाम होऊ लागलं. खरे आहे. खाजगी उद्योजक तर एकदा नाव कमावले की खर्चिक प्रोसेस गाळून जास्त कमाई करण्याच्या मागे असतात.
लेख छान आहे. आणखीअसेच येऊ द्यात.