नसते कोणी जेव्हा आपले जवळ आणि सगळेच जेथे अनोळखी
येते तेव्हाच अचानक समोर माझी प्रिय सखी
रानावनातून विखुरलेले अन वाऱ्यावर हुंदडणारे
शब्द वेडे तिच्या चाहुलीने माझ्याभोवती जमतात
आणि
माळावर कोसळावी पावसाची सर अचानक जशी
त्या पावसाच्या प्रत्येक थेंबात तिला साठवताना
नव्या थेंबातून पुन्हा नव्याने भेटते माझी प्रिय सखी
या ओळी फारच आवडल्या.
तरीहि मेघनाचे म्हणने बरोबर आहे. कविता केल्यावर तीनचार दिवस तिचे मनन करा. पुनर्लेखन करा. मग पुन्हा तीनचा दिवस मनन व पुनर्लेखन असे दोन तीन वेळा केल्यावर तिला कसे तेज येईल ते पाहा. एकदा असे करून पाहाच.