ह्या सर्व सूचना प्रत्येक दालनात, प्रत्येक दरवाजावर लिहील्या की त्यांचे हसे होते व मग समजूतदार काय किंवा समजूतदार नसलेले काय, किंवा आपण समजूतदार आहोत अशा भ्रमात असलेले काय, सर्वच तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिकतात.

अशा पाट्या लावणे म्हणजे खास मराठी आवड आहे काय? 'चपाती आहे तशीच मिळेल' 'भाजी असेल तीच मिळेल' ह्या दोन पाट्या मी पूर्वी शिवाजी पार्काच्या 'दत्तात्रेय'त बघितल्या आहेत. त्याच मुंबईतल्या कुठल्याही उडुप्याकडे असे काही लिहायची जरूर पडली नाही. समजूतदार व समजून उमजून न समजले असे दाखवणारे असे दोन्ही प्रकारचे ग्राहक फक्त मराठी रेस्टॉरंटमध्येच जातात का? मला तरी तसे वाटत नाही, कारण त्यांच्या धंद्याचा एकूण व्याप बघता उडुप्यांकडे खूपच (संख्येने) व भिन्न भिन्न प्रकारची समजूत असलेले व नसलेले ग्राहक जात असतात, असे मानणे चूक होणार नाही.--- आणि त्यातले बहुसंख्य ग्राहक निरक्षरही असतात, पाट्या वाचू शकतही नाहीत.

अशा तपशिलवार सूचना अपमानास्पद आहेत, असे ह्या लेखाच्या लेखकाने कुठेही म्हटले नाही, व तसे त्यांच्या लेखातून सूचितही होत नाही. त्या केवळ हास्यास्पद आहेत.

<<(प्रदीपराव तुमची विशेष्ण लिहिण्याची कल्पना मीही वापरणार बरंका!)>>

हे कळले नाही.