माझाही एक अनुभवः  चहा,नाश्ता व जेवणाचं वेळापत्रक व वेळा तंतोतंत पाळल्या जातील अशी पाटी होती आणि खरंच पाळल्याही गेल्या. वऱ्हाडी मंडळी विदर्भातली होती त्यांची जरा पंचाईतच झाली. लग्नाच्या दिवशी कार्यालय चार वाजता रिकामे करायचे होते पण सजवलेली गाडी वेळेवर आली नाही ४ वाजता ध्वनीक्षेपकाहून सूचना आली की तिसरा मजलयावरचे आपले सामान पहिल्या मजल्यावर आणून ठेवण्यात यावे. साडेचार वाजले गाडी आली नव्हती. परत सूचना आली की आपले सामान अंगणात आणून ठेवावे सामान हरवल्यास आम्ही जबाबदार नाही. जरा ह्या सगळ्या सूचना ऐकायला बऱ्या वाटत  नव्हत्या पण दुसरी मंडळी यायला सुरुवात झाल्यामुळे देणं अपरिहार्य होतं असं वाटलं तरी कुठेतरी उद्धटपणाही जाणवत होता त्याऐवजी एखाद्याने येवून नम्रपणे सांगितले असते तर....

आजकालच्या जेवणावळी हा एक कंटाळवाणा व काहीसा चीड आणणारा(ताटभर एकदम सग्ळं वाढून घ्यायचे कारण परत उभं राहायला नको व खाल्ल्या गेलं नाही टाकून द्यायचं) प्रकार झाला आहे. त्यावर उपाय काय? जागरुकता कशी आणावी? ह्यावर होऊ शकेल.