एका जोडप्याने पन्नास वर्षे न भांडता संसार केलेला असतो म्हणूण त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी काही पत्रकार त्यांची भेट घ्यायची ठरवतात.

एक पत्रकार त्यातल्या पतीला विचारतो, "आपल्या लग्नाच्या एवढ्या दीर्घ कालखंडात आपण कधीही भांडण केले नाही याच्या मागचे गुपीत काय?"

त्यावर तो पती उत्तरला,"त्याचे गुपीत आमच्या मधुचंद्राच्या दरम्यान घडलेल्या एका घटनेत दडलेले आहे.

  आम्ही मधुचंद्रासाठी उंच ठिकाणी गेलेलो होतो. फिरण्यासाठी म्हणूण दोघांसाठी दोन घोडे भाड्याने घेतले होते. पहिल्या वेळी आम्ही अपापल्या घोड्यांना घेऊन डोंगरकड्यांवर फिरत होतो तितक्यात माझ्या बायकोच्या घोड्याने उड्या मारायला सुरुवात केली. ही भ्याली तर नाहीच उलट दरडावणाऱ्या स्वरात घोड्याला म्हणाली, "ही तुझी पहिली चूक आहे म्हणून माफ करत आहे. अता गप्प बैस." आणि तो घेडा शांत झाला.

  थोड्या वेळा नंतर पुन्हा त्या घोड्याने तशाच उड्या मारायला सुरुवात केली. माझ्या बायकोने शांतपणे तिच्या चंचीतली पिस्तुल काढली आणि त्याच्या मस्तकात गोळी उतरवली.

  आम्ही घरी आलो. संसार सुरू झाला. काही दिवसांनी कशावरून तरी माझी व बायकोची कुरबुर झाली. आणि मी तिच्यावर ओरडलो. तिने मला शांतपणे उत्तर दिले, "ही तुमची पहिली चूक आहे म्हणून माफ करत आहे. अता गप्प बसा."

(हा विनोद चुकून मी दुसऱ्या एका सदरात टाकला होता... तिकडून काढायची विनंती प्रशासकांना केली आहे)