एका गंभीर विषयाच्या चर्चेला असे शीर्षक असणारा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. पण गांगलसाहेबांची वाक्ये वाचून दुसरे काही सुचलेच नाही.
मराठी जगातील एकमेव शास्त्रीय भाषा?
मराठीबद्दल प्रेम वगैरे मलाही आहे हो. पण आपल्या बाब्याने गल्लीच्या म्याचमध्ये शतक झळकवले तर तो लगेच पुढचा सचिन म्हणणे म्हणजे जरा जास्त होते आहे असे वाटत नाही का?
जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल.
हे वाचून शेन वॉर्नने (बहुधा गॅटींगला) पायामागून चेंडू अर्धा मैल फिरवून त्रिफळाचित केले होते त्याची आठवण झाली. आमचा त्रिफळा उडाला. कुणाला यातून अर्थबोध झाला असल्यास कृपया ते ज्ञानकण इथे सांडावेत.
इथे आणखी एक रोचक प्रश्न पडतो. (आम्हाला शाळेच्या दिवसांपासून फक्त प्रश्नच पडतात. उत्तरांच्या नावाने इल्ले.
) लोकसत्तामधले उपसंपादक किंवा ज्या कुणाकडे हे काम असते ते आपण काय छापतो आहोत हे आधी वाचून बघतात का? बघत असले तर असे प्रश्न त्यांनाही पडतात का? पडत असले तर ते त्यांची उत्तरे शोधतात का? शोधत असले तर ती त्यांना मिळतात का? मिळत नसली तर ते असे अगम्य लेख का छापतात?
हॅम्लेट