१. पर्यावरणाचे संरक्षण / पर्यावरणाचा समतोल राखणा-या महत्वाच्या वृक्षांची / रोपांची नावे.
नावांसह त्यांच्या वाढीस लागणारा वेळ, आकारमान, फळे-फुले (देत असल्यास), ही माहिती.
आपल्याला हवी असणारी सर्व माहिती काही मला नाही. जेवढे माहित आहे तेव्हडे लिहितो.
पर्यावरणासाठी म्हणजेच त्याच्या स्वास्थ्यासाठी स्थानिक वनस्पतीच उपयोगी असतात. त्यामुळे आपण ज्या परिसरात राहता त्या परिसरातील स्थानिक वनस्पती या पर्यावरणाचा समतोल राखणा-याच असतात असे समजावे. उदा. सदाहरित-निमसदाहरित भागात उंबर, वड अश्या वनस्पती योग्य ठरतील. थोड्या कोरड्या भागात सदाहरित असा क्डुलिंब महत्त्वाचा ठरेल. तळ्या काठी सदाहरित झाडे, वेली, गवताचे तेथील प्रकार, तळ्यात वाढण्याऱ्या स्थानिक वनस्पती तेथील पर्यावरणाचे हित जपतील इत्यादी.
त्यामुळे आपण जेथे राहता तो भाग कोठल्या हवामान प्रकारात मोडतो ते पहा. तेथील स्थानिक (इंडेजेनीयस) वनस्पती कोणत्या ते आपल्या गावातील महाविद्यालयातील अथवा विद्यापिठातील वनस्पतीशास्त्राच्या विभागात कळू शकेल.
आपण झाडे लावून इच्छित असाल तर परिसंस्था कशी आहे (एकोसिस्टम) ते सुधा पहा. उदा. जंगल, तळे, माळ इ.
केवळ वृक्ष लावल्यानेच पर्यावरणाला मदत होते असे नाही तर गवत, झुडपे, लहान झाडे, ऋतुंप्रमाणे उगवणारी कमी आयुर्मानाच्या वनस्पती, अनेक वर्षे जगणाऱ्या वनस्पती हे सर्वच परिसंस्थेमध्ये आपले कार्य करत असतात.
आपण पुण्यात राहत असाल तर 'इकोलोजिकल सोसायटी' दुवा क्र. १ या बाबतीत महत्त्वाचे काम गेली काही वर्षे करित आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
-- लिखाळ.