छान.
या कवितेवरून मला एक कविता आठवली.तिचे मूळ चीनमध्ये (किंवा जपानमध्येही -हायकू-असेल) आहे, असे कुठेसे वाचल्याचे स्मरते. अर्थात मूळ कविता (भाषांतरित, अनुवादित) माझ्या वाचनात आलेली नाही. पण याच संकल्पनेवर आधारित वसंत आबाजी डहाके यांचीही एक कविता आहे. त्या कवितेमधील काही अंशाचा आशय असा ः
चंद्र तूही पाहत आहेस...
चंद्र मीही पाहत आहे...
मला एवढंच सांगायचंय की तू एकटी नाहीस...
मग अस्मादिकांनाही ही कल्पना फारच आवडली...अस्मादिकांनीही लेखणी सरसावली आणि आठ-दहा वर्षांपूर्वी एक गाणे तयार झाले. त्यातील एक कडवे असे ः
चंद्र तू पाहसी, चंद्र मी पाहतो
मग दुरावा कुठे सांग ना राहतो ?
एक आहे सखी चंद्र हा आपुला !
असो. कविता छान आहे...शुभेच्छा.
नजर अंदाज....या शब्दाकडे तुम्हीही नजरअंदाज केले असते तर बरे झाले असते...मराठीत आपुलकीने लक्ष द्यावे, असे खूप शब्द आहेत...