जबरदस्त खणखणीत गझल. टोचणारी, टोचावी(च) अशी - वाचक म्हणूनही आणि कदाचित कवी म्हणूनही. सगळेच शेर आवडले. पण त्यातही -

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!

चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?

हे विशेष आवडले.

मनोगतावरील गझलांना आलेली मरगळ दूर व्हायची शुभचिह्ने दिसू लागली आहेत, असे समजावयास आता हरकत नसावी, असे वाटते