त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके
का उगीच नवखे शब्द प्रसवले होते?
लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले
(तू मुळात नुसते शब्द बदलले होते)
राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी
ते घाव मी जरी सर्व विसरले होते
मस्त आणि सहज, सफाईदार विडंबन आहे. अनेक ओळींचे संदर्भ कळल्यासारखे वाटून कळले नाहीत. त्या ओळी प्रातिनिधिक असाव्यात 