का असे निरंतर आयुष्याचे होते ?
माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते !
वेचता विखुरले तुकडे जगतो मरतो
हे असेच का हो स्वप्नबघ्याचे होते ?
लागते वळाया नजर सारखी मागे
तेव्हाच बारसे वार्धक्याचे होते
कुंचला कशाला दिलास तू डोळ्यांना ?
भलतेच रंगले चित्र उद्याचे होते
कविता छानच आहे. पण पहिल्या चार द्विपदी फारच छान आहेत. पहिली द्विपदी आणि कुंचल्याची द्विपदी तर फार फार आवडली. अगदी प्रवाही आणि सहज.