मॅग्निट्यूड ला 'मान' म्हणणे कसे वाटते? म्हणजे प्रकाशाचे मान, गतीचे मान ..........वगैरे. कुठल्याही 'सदिशाला' दिशा आणि मान असते असे म्हणणे कसे वाटेल?
प्रतिशब्द वापरताना सोप्या भाषेत अधिक विस्ताराने स्पष्टीकरण देण्याचा तुमचा विचार निःसंशय चांगला आहे. परंतु प्रतिशब्द शोधण्याला तो पर्याय होऊ शकत नाही. दोन्ही करावे असे मला वाटते. प्रतिशब्द वापरीत राहावे, सुरवातीला सोप्या भाषेत स्पष्टीकरण द्यावे म्हणजे हळू हळू सवय होईल.
अशा प्रकारे वापरीत गेलो तर प्रतिशब्दांचा वापर हा अतिरेक वाटणार नाही. शेवटी प्रत्येक विषयात जाणणारे आणि न जाणणारे असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. एका मर्यादेपलीकडे प्रत्येक ठिकाणी दोघांना बरोबर घेऊन जाणे कठीण आहे, आणि तशी अपेक्षाही नाही, असे मला वाटते.