निरयन पद्धतीत मेष राशीची सुरवात नेहमी चित्रा तारा पासून १८० अंशावर असलेल्या बिंदुपासून होते. त्यामुळे राशी व तारे यांचा संबंध कायम राहतो.प्रत्यक्ष आकाश जसे दिसेल तसे असते.

सायन पद्धतीत मेष रास वसंतसंपातबिंदूपासून सुरू होते.उदा.महाभारतकाळी वसन्तसंपातबिंदू रोहिणीत होता.म्हणून तेव्हा मेष रास रोहिणीजवळ सूरू होत होती असे मानावयाचे.