श्री.शुभानन गांगल यांचा ह्या लेखाचे एक वाचन केल्यावर माझी प्रतिक्रिया "काऽऽऽही कळलं नाही." अशी झाली. पण नेट लावून लेख पुन्हा एकदोनदा वाचला. थोडे कळले आणि मिलिंदरावांना पडलेले अनेक प्रश्न मलाही पडले.
त्याशिवायही  आणखी काही प्रश्न आहेत.

मराठी शुद्ध लेखनात चूक न होणारी व्यक्ती सापडणे कठीण आहे. सामान्य मराठी माणसाचे आयुष्य संपत आले तरी त्याच्या शुद्धलेखनातील चुका संपत नाहीत.

शुद्धलेखनात चुका होणे हा भाषेचा दोष आहे असे श्री.गांगल यांना सूचित करायचे आहे की काय?  इतर भाषांमध्ये लोक शुद्धलेखनाच्या चुका करत नाहीत की काय?

संस्कृताची नाळ तोडलेली मराठी म्हणजे कोणती? श्री.गांगल यांना जी मराठी अभिप्रेत आहे ती एकदा ’आहे कशी आननी’ हे त्यांनी आम्हालाही दाखवावे. त्यांच्या प्रस्तुत लेखातील भाषेत तर वाक्यावाक्यातून तिची संस्कृताशी असलेली नाळ तुटली नाही हेच अधोरेखित होते.   

जगाला अक्षर ही कल्पना मराठीच देऊ शकेल.  

याचा अर्थ काय? माझ्या अल्पमतीप्रमाणे अक्षर हे एक चित्रच असते. कोणत्याही भाषेची वर्णमाला ही ध्वनी आणि चित्र यातील परस्पर संबंधांची व्याख्या करते. ह्या व्याख्येत संदिग्धता जेवढी कमी तेवढी ती वर्णमाला (लिपी) चांगली असे म्हणता येईल. पण चांगली, कमी चांगली, कमी वाईट, वाईट- भाषा कशीही असली तरी प्रत्येक भाषेत अक्षरे ही असतातच. 

आणखी बरेच आहे पण तूर्तास इतकेच. कारण मुळात मला लेख कळला नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसे असेल तर वर लिहिलेले सर्व हास्यास्पद ठरण्याचीही शक्यता आहे!