चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभार, मीराताई. आपले मुद्देही बिनतोड आहेत.

शुद्धलेखनात चुका होणे हा भाषेचा दोष आहे असे श्री.गांगल यांना सूचित करायचे आहे की काय?  इतर भाषांमध्ये लोक शुद्धलेखनाच्या चुका करत नाहीत की काय?
लेख कैकदा वाचूनही श्री. गांगल यांना नक्की काय म्हणायचे आहे ते मला नीटसे कळले नाही. ते मनोगतचे सदस्य असल्यामुळे मी ही चर्चा इथे मांडली.वाटले होते की ते शंकानिरसन करतील. पण ते काही इथे फिरकलेच नाहीत.

श्री.गांगल यांना जी मराठी अभिप्रेत आहे ती एकदा ’आहे कशी आननी’ हे त्यांनी आम्हालाही दाखवावे. 
१००% सहमत.

मला लेख कळला नसल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच शंका अनेक वाचकांना येत असल्यास लेखकाला आपले म्हणणे नीट मांडता आलेले नसण्याची शक्यताच अधिक आहे.