मराठी भाषा स्वतंत्र आहे. त्यामुळे जाणकारांनी तिचा स्वतंत्र विचार करायला हवा होता.
मराठी भाषा स्वतंत्र आहे. भाषेसाठी नियम असतात. नियम भाषेपेक्षा महत्त्वाचे नाहीत, ह्या गोष्टी आता भाषाशास्त्राच्या गंभीर अभ्यासकांना मान्यच असाव्यात. आमच्यासारख्या सामान्य वाचकांसाठी, अभ्यासकांसाठी मात्र हे चर्चेचे आणि वादाचे विषय असू शकतात, असे वाटते.
गांगलांच्या लेखातील मुद्यांवर गंभीर भाषातज्ज्ञांचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. लेखातील शुद्धलेखनाच्या चुका टाळता येण्यासारख्या होत्या. अर्थात इथे उपसंपादकांनी आपले काम नीट बजावलेले दिसत नाही.