वाहतुकीच्या नियमातही एक arbitrariness (मराठीत काय म्हणतात ह्याला?) आहे. काही देशात डावीकडून तर काही देशात उजवीकडून चालवा असे का असते? लाल म्हणजे थांबा हिरवा म्हणजे जा असेच का? निळा किंवा जांभळा किंवा पांढरा का नाही?
माझ्या मते मुख्य मुद्दा प्रमाणीकरणाचा आहे. सगळ्यांनी एक संकेत स्वीकारून तो पाळणे महत्त्वाचे आहे. बहुतेक वेळा तो संकेत arbitrary असतोच. भाषेच्या बाबतीत तर जास्तच. TCP/IP सारखे प्रोटोकॉल अमक्या फ़्रेमची लांबी जास्तीत जास्त अमुकच पाहिजे असे कुठलीशी समिती ठरवते तेही असेच काही प्रमाणात arbitrary म्हणता येईल. मतदानाचे वय १८च का? १९ केले तर काय बिघडेल? १७ का नाही? कारण प्रमाणीकरण हवे म्हणून.

एखादी भाषा अनेक शतके रुळल्यावर लोकांना प्रमाणीकरणाची आवश्यकता भासते. कारण अनेक गोष्टी त्यामुळे सोप्या होतात. ह्या उद्देशाने भाषेने आपले नियम ठरवलेले आहेत.

प्रत्येक भाषेत विचित्रपणा अनियमितपणा असतोच. इंग्रजीत I shipped the parcel असे म्हणतो तेव्हा ते बोटीने पाठवत नाही. पोस्टाने पाठवतो.  cargo शब्दावरून एखादी गोष्ट कारने जात असेल असे वाटते पण ती बहुतेक वेळा बोटीने वा विमानाने जाते. स्पेलिंगच्या बाबतीतला अनियमितपणा तर अफाट आहे. तर भाषेने स्वीकारलेला अनियमितपणा आणि जाणूनबुजून किंवा त्या भाषेचे ज्ञान नसताना व्यक्त झालेला अनियमितपणा ह्यात फरक आहे.

नारायणऐवजी नारायन आणि अंगात शर्ट घालणे का शर्टात अंग घालणे हे दोन प्रकार अशा प्रकारे पूर्णपणे वेगळे आहेत.