महाभारतापासून २० फेब्रुवारी ई‌.स. २००८ च्या चंद्रग्रहणापर्यंत  १८३१८५४ दिवस किंवा ६२०३२.५ चांद्रमास किंवा ५२८५ ग्रहणवर्षे झाली आहेत. चांद्रमासात ०.५ असल्याने पौर्णिमा आहे. ग्रहणवर्षात ०.५ नसल्याने राहू-सूर्य युती आहे.(ग्रहणवर्षात ०.५ असल्यास केतू-सूर्य युती असते.)हे ५००० वर्षांचे सरासरी गणित असल्याने ग्रहण सिद्ध करता येते.पण ग्रहण कोठून व किती वाजता दिसेल यासाठी जास्त गणिताची आवश्यकता आहे.