काही ओळीत वृत्ताची गडबड झालेली आहे का?

असे वाटत नाही. रचना सैल असली तरी लयबद्ध आहे.

गा गा - गा गा - गा गा - गा

अशी काहीशी लय अखेरपर्यंत नीट सांभाळलेली आहे. ह्यातल्या प्रत्येक गा गा ह्या खंडातल्या दोन गा दरम्यान किंचित विराम आहे; पण अशा दोन खंडाच्या मध्ये ह्याहून किंचित जास्त विराम आहे. (हा नियम कसोशीने पाळला गेलेला आहे असे वाटते.)

सैल म्हणण्याचे कारण असे की बऱ्याच ठिकाणी गा गा ऐवजी लगा गा किंवा गाल गाल किंवा असेच पुढे मागे ल लावून फरक झाले आहेत. मात्र कवितेतले शब्द पारंपरिक कवितेच्या पद्धतीने न उच्चारता बोली भाषेच्या पद्धतीने उच्चारल्यास (ते ल जवळच्या गा मध्ये मिसळले जाऊन) लय अगदी नियमाने पाळलेली दिसते.

उदा.

हसत राहीन फुलत राहीन

येथे हसऽत् राहीन् फुलऽत् राहीन् असे उच्चारले गेल्यामुळे ते गा गा - गा गा अशा लयीला बाध आणत नाहीत.

चू. भू. द्या. घ्या.