ती तिच्या सख्यांची लाडकी
तोही आपल्या वर्तुळात लोकप्रिय

तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.

तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी.... अन बरंच काही
तिची विशेषणं - मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी..... अन असंच काही

अगदी नेमके! माझ्या पाहण्यातली ४-५ सपक, सुखवस्तू, शोभिवंत जोडपी उभी राहिली.  कविता आवडली!!!