मलातरी शुभानन गांगल यांच्यापेक्षा अरूण फडके यांची मराठी शुद्धलेखना बाबतची भूमिका अधिक योग्य वाटते. त्यांच्या मते शुद्धलेखन महामंडळाने केलेले नियम पुरेसे आहेत फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची जास्त गरज आहे. मराठीच्या माध्यमिक पुस्तकांमागे हे नियम दिलेले आहेत पण कुणीही मुलं ते वाचायचे कष्ट घेत असतील असे वाटत नाही. शिक्षकांनी त्यांची ओळख करून देणे किंवा त्यांवर आधारलेल्या तोंडी परीक्षा घेणे आवश्यक आहे. एकदा ओळख करून दिली की मुलं त्यांच्या कुतुहलाने हमखास शुद्ध शब्दांचा आग्रह धरतील. भावेत असताना शारीरिक या शब्दाबद्दल सांगताना आमच्या शिक्षिका म्हणाल्या की या शब्दाबाबत पहिली दुसरी आणि दुसरी पहिली एवढं लक्षात ठेवा. हे आजही माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि हा शब्द माझ्याकडून तरी कधी अशुद्ध लिहला जाईल याची सुतराम शक्यता नाही.
   उगाच जगाला अक्षर संकल्पना देणे आणि मराठीला एकमेव शास्त्रीय भाषा म्हणून स्थान मिळेल वगैरेपेक्षा आधी हे सोपे उपाय करणे गरजेचे आहे.

-सौरभ.

अरूण फडकेंचे 'शुद्धलेखन तुमच्या खिशात' हे पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच हवे. कित्येक शब्द आपण छातीठोकपणे चुकीचे वापरतो याची कल्पना येईल.