आपण प्राचीन भारतीय खगोलशास्त्र या मालिकेतून  फार सुंदर माहिती दिली आहे. या अनुषंगाने मला जाणून घ्यायला आवडेल की जयद्रथ वधाचा सूर्यग्रहणाशी संबंध होता का?

अर्जुनाने सूर्य मावळण्याच्या आत जयद्रथाचा वध करेन अन्यथा अग्नित उडी घेईन अशी प्रतिज्ञा केली होती. दिवसभरात जयद्रथाचे कौरव सेनेने रक्षण केले आणि अर्जुनाला त्याचा वध करता आला नाही.  सूर्य मावळतीकडे निघाला आणि अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होणे अशक्य वाटू लागले. सूर्य मावळला (कृष्णाने झाकला?)  व अर्जुनाने चितेत प्राणार्पण करण्याची तयारी केली. तेव्हा आता आपल्याला काहीच धोका नाही असे वाटून जयद्रथ कौरव सेनेच्या संरक्षणातून बाहेर पडून बेसावधपणे उघड्यावर आला. ही संधी साधून कृष्णाने आपल्या दैवी सामर्थ्याने झाकलेला सूर्य पुन्हा दृगोच्चर केला आणि अर्जुनाला आज्ञा केली हा सूर्य आणि हा जयद्रथ. पुढे अर्जुनाने त्याचा कृष्णाने सांगितलेल्या पद्धतीने वध केला.

या संपूर्ण घटनाक्रमात किती तथ्य आहे? याचा खग्रास सूर्यग्रहणाशी संबंध होता असे म्हणतात. पण असे असेल तर सूर्य मावळणे आणि ग्रहणाच्या खग्रास स्थितीत जाणे यातील फरक कोणाला कळला कसा नाही? सूर्यग्रहण  होणार आहे हे कौरवांपैकी कुणालाच माहित नव्हते?

यावर अधिक प्रकाश टाकता येईल का?