महामंडळाने केलेले नियम.... लोकांपर्यंत पोहोचवण्याची जास्त गरज आहे. मराठीच्या माध्यमिक पुस्तकांमागे हे नियम दिलेले आहेत पण कुणीही मुलं ते वाचायचे कष्ट घेत असतील असे वाटत नाही. शिक्षकांनी त्यांची ओळख करून देणे किंवा त्यांवर आधारलेल्या तोंडी परीक्षा घेणे आवश्यक आहे.

- सहमत.
       ते नियम पुरेसे आहेत काय अथवा योग्य आहेत काय याविषयी अधिकारवाणीने बोलण्याइतका त्या विषयाचा माझा अभ्यास नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या साहित्य परिषदेने १९६०च्या दशकाच्या पूर्वार्धात हे नियम बनवले तेव्हापासूनच दबलेल्या आवाजात कुजबूज असायची की हे नियम मराठीच्या भल्यासाठी कमी व सचिवालयातील मराठी टंकलेखकांच्या सोयीसाठी अधिक रचले गेले आहेत. खरं खोटं देवाला ठाऊक.