जर काय असेल तर तो बिनीवाल्यांचा लेख. तो इथे निदर्शनात आणलेत हे चांगले केलेत, पण त्यावर फार चर्चा करण्याइतपत त्या लेखाची लायकी आहे, असे मला वाटत नाही.
मारुती चित्तमपल्ली त्यांच्या वनसंशोधनाच्या निमीत्ताने अनेक आदिवासींना भेटले. त्यांनी त्या आदिवासींकडून जंगलातल्या निसर्गनियमांबद्दल खूप काही शिकून घेतलेच, पण त्याचबरोबर ते आदिवासी विवीध पशू पक्षींना, वनस्पतिंना, झाडांना ज्या शब्दांनी संबोधतात, त्याचीही इत्थंभूत माहिती करून घेतली. चित्तमपल्ली त्यांच्य्या लेखात ही संबोधने आनंदाने व चोखपणे वापरत असतात. त्याची मला ह्या निमीत्ताने आठवण झाली.