भास्कर केंडे, कथा आवडली! कथेचा विषय चांगला आहे. मुक्याची गावातली शाळा, गावातल्या शाळेच्या आणि शहरातल्या शाळेच्या वातावरणातला फरक, त्यामुळे मुक्याला सुरुवातीला अडचणी/स्पर्धात्मक अपयशाला सामोरं जावं लागणं, आणि शेवटी अंगभूत गुणवत्ता, प्रयत्न, भावाचं प्रोत्साहन यामुळे त्याला मिळालेलं यश हा घटनाक्रम सलग ओघात चांगला उतरला आहे. मात्र शेवटी शेवटी त्याला अडथळा शर्यत, सायकल शर्यत यांत आलेलं अपयश आणि सामान्य ज्ञान स्पर्धेत मिळालेली ढाल हे २-३ प्रसंग अजून बारकाव्यांनिशी फुलवता येऊ शकले असते असं वाटतं(जसा तुम्ही कथेच्या सुरुवातीचा मुक्या-नाना-काका यांचा रेडीओवर पी.टी. उषाचं सुवर्णपदक जिंकण्याचा प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला आहे, तश्या पद्धतीनं).
अर्थात माझं हे मत वैयक्तिक आवडीनिवडींवर आधारलेलं असल्यानं कदाचित या बाबतीत चूकही असू शकतं.
चांगली कथा सादर केल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
संकल्प