कस्टडीचा वर्तमानपत्रात गाजलेला खटला आठवला.

तो हळुवारशा कविता करतो,
मैफिली दोस्तांच्या गाजवतो.
तिचाही गळा म्हणे गोड आहे,
भावगीतांचं तिला वेड आहे.

तो आहे अभिजात रसिक,
मोठ्या मनाचा, विचारी.... अन बरंच काही
तिची विशेषणं - मनमिळाऊ, समजूतदार
शांत, करारी..... अन असंच काही
तो वक्तशीर, व्यवस्थित
ती टापटिपीची, नियमित
कार्यालयं नेटकी त्यांची,

तरीही
मात्र घडी विस्कटलीय प्रपंचाची..

असेच वास्तवात आढळते. मन विषण्ण होते. असे का आहे? कळत नाही.

वास्तव आहे . कविता आवडली. साहित्य हा समाजाचा आरसा आहे हे पटते. शुभेच्छा.