सखे, गीत हे घायाळ माझे
निजतो घेउन मी उशाला
सुन्न या माझ्या चांदरातीला
देतेस तु ही हाक कशाला?

सखे, मोजण्या लक्तरे माझी
आजही बघ्यांचा गाव आला
सात्वंनेच्या डोळ्यात आजही
का कोरडाच गं भाव आला?

मी न कधी टाकीन खाली
तुझ्या स्वरांचा हा रिक्त प्याला
भले उद्या सोडावयास लागु दे
मज अधीर श्वासांची मधुशाला.... वा अतिशय सुंदर ओळी आहेत

-मानस६