त्यांनी मला नऊ वाक्यांसाठी आधी नऊ अंक दिले (एखाद्या खेळात देतात तसे) आणि मग मला नऊ रुपये बक्षीस दिले. बरोबर?
मग त्यांनी कॉल सेंटर ऐवजी बॉल सेंटर करून त्यांचेही एक मुद्राराक्षसाचे वाक्य बनवले. मग ते म्हणाले की आता मला एक खंक आणि एक रुपया पाठवा. या वाक्यात त्यांनी पुन्हा मुद्राराक्षसाचा विनोद केला. खंक ऐवजी त्यांना अंक म्हणायचे असेल. समजलं का? असं आहे ते. पण खंक म्हणजे काय ते समजले मात्र नाही. म्हणजे खंक या शब्दाचा अर्थ मला महिती नाही.