पूर्वी 'अमृत' नावाच्या मासिकात 'मुद्राराक्षसाचा विनोद' असे एक सदर असायचे. त्यात मुद्रणातील चुकांमुळे झालेले विनोद वाचकांकडून मागवत असत. हे प्रत्यक्ष घडलेले विनोद असणे आवश्यक होते. जिथे असे चुकीचे छापून आले असेल त्या वर्तमानपत्रातील कात्रण सोबत पाठवावे लागत असे. मोबदला म्हणून एक अंक व एक रुपया मिळत असे.
मनोगतावरच कुठेतरी अशा प्रकारचे विनोद दिलेले आहेत. त्यातील सहज आठवलेला एक:
पत्रकार त्यांना भेटायला गेले तेव्हा ते गाढव शांतपणे झोपले होते. (गाढ व शांतपणे)