प्रभाकर ह्याच्यांशी पुर्णपणे सहमत..
आपण किती दिवस असे भांडणार आहोत ?
कांदळकर, आपले मराठी फेरीवाल्यांबद्दल काय म्हणणे आहे ? ते बहुतेक उवद्रव करीत नाहीत असा आपला गोड गैरसमज दिसतोय. सगळे कायदा मोडणारे लोकसारखेच, का आपण असे मराठी-अमराठी वर्गीकरण करतो ?
किंबहुना मी सुद्धा कागदावर अमराठी आहे, पण मला ओळखणारे लोक मला मराठी म्हणूनच ओळखतात.. आणि मी सुद्धा स्वतःला एक महाराष्ट्रीयनच किंबहुना भारतीय किंबहुना एक माणुस समजतो..
मराठी जरी माझी मातृभाषा नसली तरी माझे मराठी चांगले आहे आणि मी मराठीत कविता पण लिहितो. मी कधीही बोलताना हिंदीएवजी मराठीला प्राधान्य देतो. (कारण बहुतेक मला मराठी जास्त जवळची वाटते म्हणुन.)
मला माझ्या जीवनातील एक प्रसंग सांगावासा वाटतो,
मी पुण्याला शिक्षणासाठी होतो, तेव्हा मी एका मराठी(?) गृहस्थाकडे खानावळ लावली होती. त्यांच्याशी येता जाता गप्पा चालायच्या.. ते मला पण मराठी मुलगा म्हणून ओळखायचे. त्यांच्या समोरच एक सोसायटीत बरेच मारवाडी लोक राहायचे. ते नेहमी आमच्याशी बोलताना त्या लोकांचा उल्लेख करायचे. त्याच्यामते - "राहुल, अरे या मारवाडी लोंकाकडे फार पैसा असतो ! आणि ते सगळे एकमेकांना मदत करून व्यवसाय करतात. आपण मराठी लोकांकडे भांडवलच नसते त्यामुळे आपल्या सारख्या लोकांना नोकरी करावी लागते अथवा खानावळीसारखे छोटे (?) धंदे करावे लागतात..." त्याच्या मते मारवाडी लोक(म्हणजेच आम्ही !) सगळे सोन्यांच्या ताटात जेवणारे असतो.. मारवाडी अथवा सिंधी बांधव मराठी लोकांच्या तुलनेने कमी असलेल्या उद्यमजतेचे खापर फोडायला चांगलेच सावज आहेत..
तर अश्या या काकांकडे त्याच्या बोलण्याचा राग न करता मी वर्षभर जेवायला जात राहिलो.. मला माहीत आहे हा त्यांचा दोष नाहीये, आपल्या सारखे लोक राज्यकर्त्यांच्या खेळातले बाहुले आहोत.. जसे आपण मोठ्या(?) लोकांकडून एकतो तसेच करतो..
जर मी (की "आम्ही मारवाडी" म्हणून परत एकदा प्रांतीयवाद मध्ये आणू ?
) "मन से" वागलो असतो तर त्या काकांचे घर तोडुनच आलो असतो
पण मी माझ्या "मना प्रमाणे" वागलो आणि त्यांचे मत बदलेल अशी प्रार्थना केली
एका वर्षानंतर जेव्हा त्यांनी मला मारवाडी बोलताना एकले तेव्हा त्यांना कळाले की ते वर्षभर एका मारवाडी मुलाकडे मारवाडी लोकांची निंदा करत होते. त्यानंतर माझ्या उदाहरणावरून तरी त्यांचे मत बदलले असेल अशी आशा करतो.
-राहुल
(ता.क. माझ्या घरी कोणीही व्यवसाय करत नाही आणि कोणीही आम्हाला व्यवसाय उघडायला मदत केली नाही.
आणि माझ्या मराठी मित्रांची संख्या मारवाडी मित्रांपेक्षा कितीतरी जास्त आहे! )