मी जे काही फुले वाङ्मय वाचले ते पुस्तकी भाषेत होते अशी माझी आठवण आहे. कदाचित सगळे वाङ्मय नसेल तसे. माझी चूक झाली असणे शक्य आहे.
पण तरीही प्रमाणीकरणाचा मुद्दा आहेच. जर पुरोगामी लोकांना ब्राह्मणी संस्कृतीने बनवलेले नियम जाचक वाटत असतील तर त्यांनी मराठी व्याकरणात उचित बदल करावेत. पण नियम असताना ते तोडण्याचा अट्टाहास का?
दया पवार आणि मंडळींनी आपल्या जीवनाची अनुभुती यावी म्हणून ती भाषा वापरली आहे. मला खात्री आहे की जर दया पवार एखाद्या कचेरीत काम करत असते आणि रजेचा अर्ज मराठीत लिहायची वेळ आली असती तर त्यांनी असली भाषा वापरली नसती.